बरेली : बहेडी, नवाबगंज, शहााबाद, बारखेडा येथील चार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे २८४.७७ कोटी रुपये थकवले आहेत. शेतकरी आपल्या थकीत बिलांसाठी ऊस समितीपासून ते जिल्हा ऊस अधिकारी, जिल्हा दंडाधिकाऱ्यांपर्यंत चकरा मारत आहेत. मात्र पैसे मागितल्यावर त्या बदल्यात फक्त आश्वासन मिळत आहे. शेतकरी किसान क्रेडिट कार्डचे कर्ज भरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर व्याजाचा बोजा वाढत आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकरी आपला ऊस इतर जिल्ह्यातील कारखान्यांना पाठवत आहेत. २०२२-२३ मध्ये बारखेडा आणि रामपूर जिल्ह्यातील शाहबाद येथील साखर कारखान्यात ऊस पाठवला. साखर कारखान्यांनी ऊस खरेदी केल्यावर १५ दिवसांच्या दर देण्याचा नियम आहे. मात्र, चार साखर कारखान्यांचा गळीत हंगाम एप्रिल २०२३ मध्ये संपूनही ऊस बिले दिलेली नाहीत. कारखानदारांवर बिले देण्यासाठी दबाव वाढवल्याचे जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले. लवकर ऊस बिले न दिल्यास व्याजासह रक्कम वसूल केली जाईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
बहेडी कारखान्याने ५६ टक्के पैसे दिले आहेत. तर नवाबगंज कारखान्याने ५५ टक्के पैसे दिले आहेत. बरखेडा कारखान्याने फक्त २८ टक्के पैसे दिले असून शहाबाद कारखान्याकडे १९ टक्के ऊस बिले थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसने पैसे घेवून औषधोपचार करावा लागत आहे असे टीयूलीचे शेतकरी तेजपाल सिंह, महिपाल सिंह यांनी सांगितले.