मुंबई : महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांना उधाण आले आहे. अनेक ठिकाणी पुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईतील उपनगरे, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्र, कोकणासह विदर्भात पावसाची तिव्रता वाढली आहे. यादरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळेल.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, कोकम, विदर्भाचा समावेश आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट लागू आहे.
तर गढचिरोली, गोंदिया, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असेल. मराठवाड्यातील तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे मुंबई, ठाणे विभागात वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. तर वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यात पावसाने नुकसान झाले आहे. सुमारे ४५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.