गोला गोकर्णनाथ : राष्ट्रीय किसान शक्ती संघटनेच्या (राकिशसं) पदाधिकाऱ्यांनी खंभारखेडा येथील साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊस बिलांची मागणी करत याप्रश्नी १६ ऑगस्टपासून सत्याग्रह आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राष्ट्रीय किसान शक्ती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पटेल श्रीकृष्ण वर्मा यांनी याबाबत जिल्हाधिकारी महेंद्र बहादूर सिंह यांना निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, गेल्या चार महिन्यापासून बजाज साखर कारखाना, खंबारखेडाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले देण्यात आलेली नाहीत. शेतकऱ्यांना फक्त २५ दिवसांची ऊस बिले मिळाली आहेत. आता नवीन गळीत हंगाम सुरू होण्यास फक्त तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले तातडीने दिली जावीत. याप्रश्नी आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.