नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय अन्न मंडळाने (एफसीआय) बुधवारी पाचव्या ई-लिलावात १.०६ लाख टन गहू आणि १०० टन तांदळाची विक्री केली. एफसीआयकडून तांदूळ, गहू आणि आट्याच्या किरकोळ दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी साप्ताहिक आधारावर ई लिलावाचे आयोजन केले जाते.
द प्रिंटमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकार अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्राहकांना तत्काळ दिलासा देणे हे बाजारात हस्तक्षेप करण्याचे कारण आहे. एफसीआयने सांगितले की, लिलावामध्ये देशातील १७८ डेपोंमधून एकूण १.१६ लाख टन गहू आणि १.४६ लाख टन तांदळाचा समावेश होता. एफएक्यूच्या गव्हाचे सरासरी विक्री मूल्य २१८२.६८ रुपये प्रती क्विंटल होते. तर आरक्षित मूल्य २,१५० रुपये प्रती क्विंटल होते. कमी गुणवत्तेच्या गव्हाचे मुल्य २१,७३.८५ रुपये प्रती क्विंटल तर आरक्षित मूल्य २१२५ रुपये प्रती क्विंटल आहे. तांदळाचा दर ३१५१.१० रुपये प्रती क्विटंल आहे.