मुरादाबाद : छजलैट विकासखंड अंतर्गत रामकिशन यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सर्व्हे केला. यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, ऊसासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास त्याचे निराकरण करण्यास संबंधीत ऊस समित्यांना सक्त सुचना देण्यात आल्या आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी ऊसाच्या नोंदणीत कोणत्याही प्रकारची गडबड खपवून घेतली जाणार नाही, असे ऊस समित्यांना बजावले आहे. जर उसाच्या सर्व्हेबाबतच्या तक्रारीचे समितीकडून निराकरण करण्यात आले नाही, तर त्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्याची निर्गत लावली जाईल. यावेळी जिल्हा ऊस अधिकारी, सरकारी ऊस समितीचे सचिव, सुपरवायझर आदी उपस्थित होते.