सोलापूर : मातीची योग्य काळजी घेतल्यास उसाचे उत्पादन वाढण्यास मदत होते, असे मत विजयकुमार थोरात यांनी व्यक्त केले. गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी थोरात बोलत होते.
थोरात म्हणाले कि, व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून शेती करणे काळजी गरज बनली आहे. शेती करताना मातीची काळजी घेतल्यास ८० टक्के उत्पादन वाढेल, असा दावाही थोरात यांनी यावेळी केला. ते म्हणाले, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढविण्याची गरज आहे. जमीन व पाण्याची विद्युत वाहकता आणि सामू तपासणे गरजेचे आहे. त्यामुळे पिकास कोणत्या घटकांची कमतरता आहे, हे जाणून घेणे शक्य होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, संभाजी भोसले, कालिदास पाटील, सुरेश भुसे, दशरथ जाधव, विष्णू बागल, दिनकर चव्हाण आदी उपस्थित होते.