शामली : अलिकडेच उत्तर प्रदेश ऊस विभागाने जारी केलेल्या रिपोर्टनुसार शामली जिल्हा ऊस उत्पादनात प्रथम क्रमांकावर आला आहे. मात्र, २०२३-२४ साठीच्या ऊस सर्व्हेमध्ये जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्रात घट झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील ऊस लागवड ४.५८ टक्क्यांनी घटली आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात जवळपास एक लाख शेतकरी ऊस शेती करतात. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी सांगितले की, यावेळी ऊस सर्व्हेत ३७,१३४ हेक्टरमध्ये लागण तर ३९,१४९ हेक्टरमध्ये खोडवा असे एकूण ७६.२८३ हेक्टर ऊस क्षेत्र असल्याचे आढळून आले आहे. तर याआधीच्या गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये लागण क्षेत्र ३७,२५७ हेक्टर आणि खोडवा क्षेत्र ४२,६८६ हेक्टर असे एकूण ७९,९४२ हेक्टर होते. एकूण ३,६६० हेक्टर क्षेत्रामध्ये घट झाली आहे. हे प्रमाण ४.५८ टक्के होते. जिल्ह्यात शामली, ऊन, तितावी, खतौली, बुधाना, थानाभवन या कारखान्यांच्यावतीने उसाचे गाळप केले जाते.