युपी : थकीत ऊस बिलांप्रश्नी आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा

बागपत : मलकपूर साखर कारखान्याद्वारे ऊसाची बिले मिळाली नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बामणौली गावात बैठक घेतली. यावेळी जर कारखान्याने लवकरात लवकर पैसे दिले नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, मलकपुर, भैसाना, किनौनी या कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. इतर कारखान्यांनी गळीत हंगाम संपुष्टात आल्यावर लगेच शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. शेतकरी पैसे नसल्याने आर्थिक अडचणींशी झुंज देत आहेत. मात्र, साखर कारखानदारांना त्याचे काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसून येते अशी टीका यावेळी विविध वक्त्यांनी केली.

दर दहा दिवसात पैसे दिले नाहीत, तर शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी योगेंद्र सिंह, सुरेश, प्रमोद, सुभाष तोमर, नरेश तोमर, अरविंद, जगपाल, सतेंद्र, रहीस, सुरेंद्र, महेंद्र सिंह, सतेंद्र आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here