सोलापूर : मान्सूनने उशीर केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उसाचा वापर चारा म्हणून वापरण्यास सुरुवात केल्याने महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांना आगामी गळीत हंगामात कठीण परिस्थिती निर्माण होईल अशी भीती सतावत आहे. याबाबत पंढरपुर तालुक्यातील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी साधारणतः १० ते १५ टक्के ऊस यासाठी वळवला जाईल अशी शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यात ३८ साखर कारखाने आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही एका जिल्ह्यात असलेल्या कारखान्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. या विभागात ऊस लागवड २.५ ते ३ लाख हेक्टरमध्ये केली जाते. दरवर्षी २०० लाख टन उसाचे गाळप केले जाते. राज्यातील सर्व भागांप्रमाणे यंदा सोलापुरमध्येही मान्सूनला उशीर झाला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पिकाचा चारा म्हणून वापर सुरू केला आहे. डेअरी उद्योगासाठी चाऱ्याची गरज भासते.
कुलकर्णी म्हणाले की, चाऱ्यासाठी ऊसाचा वापर हा साखर कारखान्यांसाठी धोक्याचा इशारा आहे. साधारणपणे १० ते १५ टक्के ऊस पिक चारा म्हणून वापरले जाईल असे अनुमान आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी थांबण्याऐवजी चारा म्हणून त्याची विक्री करून पैसे कमावले आहेत.
पंढरपुर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील म्हणाले की, शेतकरी चाऱ्यासाठी २५०० रुपये टन दराने ऊस खरेदी करीत आहेत. पावसाची अनिश्चितता पाहता शेतकऱ्यांनी हा पर्याय स्वीकारला आहे. अंबे येथील डेअरीस दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना दररोज १०० टन ऊस विक्री केला जात आहे.