जालना : पैठण तालुक्यातील संत एकनाथ – सचिन घायाळ शुगर साखर कारखान्यात २०२३-२४ गाळप हंगामासाठी मिल रोलर पूजन करण्यात आले. यावेळी सीए सचिन घायाळ म्हणाले कि, कारखाना पूर्ण क्षमतेने चालावा यासाठी नवीन मशिनरी बसविण्यात आली आहे. नवीन मशिनरीमुळे प्रति दिन ३ हजार मेट्रिक टन गाळप क्षमता वाढल्याचे घायाळ यांनी सांगितले.
आगामी गाळप हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूकदार यांच्याशी करार करून ५०० टायर गाड्या, २५० जुगाड, १०० वाहन टोळी यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही घायाळ यांनी दिली. लवकरच कारखाना परिसरात इथेनॉल प्रकल्प स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आगामी गाळप हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रल्हाद औटे, विक्रम घायाळ, गोपीकिशन गोर्डे, डीगुतात्या गोडे, गणेश घायाळ, दीपक घायाळ, पवन खरात आदीसह शेतकरी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.