श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात रोलर पूजन

सोलापूर : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आगामी गाळप हंगामासाठी पृथ्वीराज सावंत यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. भैरवनाथ शुगर ग्रुपच्या माध्यमातून कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

सावंत म्हणाले, आदिनाथ सुव्यवस्थित चालविण्यासाठी भैरवनाथ शुगरतर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पाठवून गाळप हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ‘आदिनाथ’चे प्रशासक बाळासाहेब बेंद्रे, प्रशासक मंडळाचे सदस्य महेश चिवटे, संजय गुटाळ, ‘आदिनाथ’चे कार्यकारी संचालक अरुण बागनवर, ए.आर.खाडे, के.आर.पाटील, दीपक देशमुख, मुख्य शेती अधिकारी एस.आर.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here