महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे हाहाकार, ४ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने चिंता वाढवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवारी दिल्ली, महाराष्ट्रासह हिमाचलमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये आज, २९ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. आयएमडीने राज्यातील चार प्रमुख शहरांमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड, पुणे, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

दरम्यान, नवभारतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, महाराष्ट्रात पालघर, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. आगाी चार दिवसांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने हा अलर्ट दिला आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने अनेक गावांत पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने नागपूर, वर्धा, चुलढाणा, गोंदियासाठी पुढील चार दिवस आणि चंद्रपूर, गडचिरोली, अमरावतीसाठी तीन दिवस आणि यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशीमसाठी दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here