सिध्दी शुगरकडून शेतकऱ्यांना आडसाली ऊस लागवडीस प्रोत्साहन

लातूर : सिध्दी शुगरकडून कोएम – ०२६५ जातीच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या शेतात रोपे लावून आडसाली ऊस लागवडीस प्रारंभ करण्यात आला. चेअरमन, आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले कि, मराठवाड्यात आडसाली ऊस लागवडीचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या तुलनेत मराठवाड्यात रिकवरी कमी पडते. कारण मराठवाड्यात बहुतांश शेतकरी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान उसाची लागवड करतात. त्यामुळे १५ ऑक्टोबरला कारखाने सुरु झाल्यानंतर परिपक्व ऊस कमी प्रमाणात गाळपास येतो, त्याचा रिकवरीवर परिणाम होतो. आमदार पाटील म्हणाले कि, कोल्हापूर, पाडेगाव, इंदापूर आणि बारामती येथून चांगल्या प्रतीचे बेणे किंवा रोपे शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार बांधावर पोहचविण्यात येणार आहेत. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, पी.जी.होनराव, एस.आर.पिसाळ, पी.एल. मिटकर, वाय.आर.टाळे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here