कोल्हापूर : स्वराज्य सरपंच सेवा संघ (महाराष्ट्र) यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मानाच्या राज्यस्तरीय ‘सहकार समाजभूषण पुरस्कार-२०२३’ करीता सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली.
श्री.पाटील हे मे-२०१८ पासून कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि.,अंकुशनगर, (ता.अंबड, जि.जालना) येथे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कारखान्यामध्ये विविध योजना राबवून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या कार्यकाळात दोन इथेनॉल प्रकल्पांची उभारणी झाली आहे. त्याचबरोबर साखर कारखान्याचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यांच्या कार्यकाळात कारखान्यास देश व राज्य पातळीवरील विविध पारितोषीक व पुरस्कार मिळालेले आहेत. सहकारी साखर कारखानदारीमध्ये श्री.पाटील यांचे उल्लेखनीय कामाची यानिमित्ताने दखल घेतली गेली आहे.
पुरस्काराचे वितरण रविवार, ३० जुलै २०२३ रोजी अहमदनगर येथे आदर्श संरपच भास्करराव पेरे पाटील व हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचे शुभहस्ते सन्मानपुर्वक करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सेवा संघाचे बाबासाहेब पावसे, निलेश पावसे, अमोल शेवाळे, राजेंद्र गिरी, रविंद्र पवार, रोहीत पवार, संजय काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.श्री.पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक माजी सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री, आमदार राजेश टोपे, कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक, खाते/विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व कामगार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.