साखर आयुक्तालयाकडून २०२३-२४ हंगामासाठी साखर कारखान्यांना गाळप परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सूचना

पुणे : साखर आयुक्त कार्यालयाने २८ जुलै २०२३ रोजी एक आदेश काढून राज्यातील सर्व साखर कारखान्यांना गळीत हंगाम २०२३-२४ साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आदेशात म्हटले आहे कि, गाळप हंगाम २०२२-२३ च्या ऊस गाळप हंगामाचा आढावा आणि सन २०२३-२४ गाळप हंगामाचे धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या बैठकीत निश्चित होईल. या बैठकीत धोरण निश्चित झाल्यानंतर २०२३-२४ गाळप हंगाम सुरु करण्याबाबत कारखान्यांना कळविण्यात येईल. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना आगामी हंगामासाठी ऑनलाईन गाळप परवाना अर्ज सदर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

अर्ज सदर करण्यासाठी १ ऑगस्ट २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. कारखान्यांनी अर्ज सादर केल्यानंतर ७ दिवसात प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या स्तरावर छाननी होणार आहे. त्यानंतर साखर आयुक्तालय स्तरावर छाननी आणि ऑनलाईन गाळप परवाना वितरीत करणात येणार आहे. साखर कारखान्यांनी https:// crushinglic.mahasugar.co.in/login.aspx या वेबसाईटवर १ ऑगस्टपासून गाळप परवाना अर्ज करावेत, असे आवाहन साखर आयुक्तालय कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here