पाकिस्तानात हाहाकार, पेट्रोल दरात अचानक २० रुपयांची वाढ, एक लिटरसाठी लोक मोजताहेत २७० रुपये

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आयएमएफपासून चीनपर्यंत सगळीकडून मदतीचा दिलासा मिळाला आहे. मात्र, देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. आधीच आटा, दूध, भाजीपाला अशा रोजच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी झगडणाऱ्या लोकांवर सरकारमुळे पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रती लिटर १९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकारने ३१ जुलै रोजी इंधन दरात वाढ केली आहे. यामध्ये पारिस्तानातील सध्याच्या पेट्रोलच्या दरात १९.९५ रुपये आणि डिझेलच्या दरात १९.९० रुपये प्रती लिटर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक ऑगस्टपासून हे नवे दर लागू झाले आहेत. आधीच महागाईशी झगडणाऱ्या जनतेसाठी हा मोठा झटका आहे, असे जीओ न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे.

पाकिस्तानमधील शहबाज शरीफ सरकारच्या अलिकडे करण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीनंतर एक लिटर पेट्रोलचा दर २७२.९५ रुपये झाला आहे. तर डिझेल २५३.५० रुपये लिटर आहे. सरकारने देशहितासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. दरम्यान आयएमएफने पाकिस्तानला ३ अब्ज डॉलरची मदत देण्यास मंजुरी दिली आहे, असे अर्थ मंत्री इशर दार यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here