देशात जुलै 2023 महिन्यात 1,65,105 कोटी रुपये सकल वस्तू आणि सेवा कर महसूल संकलित

देशात जुलै 2023 मध्ये संकलित झालेला सकल वस्तू आणि सेवा कर महसूल 1,65,105 कोटी रुपये असून त्यापैकी 29,773 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, 37,623 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर, तर 85,930 कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (वस्तूंच्या आयातीतून संकलित केलेल्या 41,239 कोटी रुपयांसह) आणि 11,779 कोटी रुपये उपकर (वस्तूंच्या आयातीतून संकलित केलेल्या 840 कोटी रुपयांसह) रुपात संकलित करण्यात आले आहेत.

सरकारने, एकात्मिक वस्तू आणि सेवा करापैकी 39,785 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच 33,188 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात मंजूर केले आहेत. नियमित मंजूरीनंतर, जुलै 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल CGST साठी 69,558 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच 70,811 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर इतका आहे.

देशातील जुलै 2023 चा महसुल मागील वर्षीच्या याच महिन्यातील वस्तू आणि सेवा कर महसुलाच्या तुलनेत 11% ने अधिक आहे. या महिन्यात, देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुला च्या तुलनेत 15% ने अधिक आहे. सकल वस्तू आणि सेवा कर संकलन पाचव्यांदा 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

महाराष्ट्राच्या वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्क्याने वाढ झाली असून जुलै 2023 मध्ये 26064 कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे. महाराष्ट्रात जुलै 2022 मध्ये 22,129 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला होता.

गोवा राज्याच्या वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्के वाढ झाली आहे असून जुलै 2023 मध्ये 528 कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे. गोव्यात जुलै 2022 मध्ये 433 कोटी रुपये कर संकलन झाले होते.

महाराष्ट्रात, जुलै 2023 महिन्यात 7,958 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात संकलित करण्यात आले तर 4167 कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कराचा भाग म्हणून राज्याला मिळाले. अशा प्रकारे राज्यात एकूण 12,124 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला आहे .

गोव्यात, जुलै 2023 महिन्यात 173 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात संकलित करण्यात आले, तर 146 कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कराचा भाग म्हणून राज्याला मिळाले. अशा प्रकारे राज्यात एकूण 320 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला आहे .

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here