भारताच्या तांदूळ निर्यात निर्बंधामुळे जागतिक स्तरावर लाखो लोकांवर होणार परिणाम

नवी दिल्ली : देशांतर्गत किमतीचे नियंत्रण आणि स्थिर पुरवठा व्हावा यासाठी जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश असलेल्या भारताने २० जुलै रोजी गैर बासमती सफेद तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम जागतिक तांदूळ बाजारावर पडणार आहे. त्यातून लाखो लोकांना फटका बसण्याची शक्यता आहे. आशियाई आणि आफ्रिकी ग्राहकांना खास करून याचा परिणाम सोसावा लागेल. जांदळाच्या जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. भारताने पहिल्यांदाच गैर बासमती तांदळावर निर्यात निर्बंध लावलेले नाहीत. मात्र, याचा परिणाम आधीपेक्षा अधिक दूरगामी होतील अशी शक्यता आहे.

बार्कलेजच्या अहवालानुसार, भारतीय तांदळावर अवलंबून असलेल्या देशांपैकी मलेशियाला सर्वाधिक फटका बसू शकतो. अभ्यासकांच्या मतानुसार मलेशिया आपल्या तांदूळ पुरवठ्यातील मोठा हिस्सा आयात करतो. भारताच्या या निर्णयाने सिंगापूरवर विपरित परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

मात्र, बार्कलेजने म्हटले आहे की, सिंगापूर खूप प्रमाणात केवळ तांदूळच नव्हे तर इतर अन्नपदार्थ आयातीसाठी अवलंबून आहे. देशाने सध्या भारताकडे निर्यात निर्बंधातून सूट मागितली आहे. अल नीनोमुळे थायलंड, पाकिस्तान आणि व्हिएतनाम यांसारख्या प्रमुख आशियाई तांदूळ उत्पादकांकडून जागतिक उत्पादनावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

बार्कलेजच्या म्हणण्यानुसार, फिलिपाइन्स जागतिक तांदळाच्या किमतीमधील वाढीमुळे सर्वाधिक परिणाम होईल. कारण, देशाच्या सीपीआयमध्ये तांदळाचा भार अधिक आहे. फिलिपाइन्सच्या तांदूळ आयातीचा हिस्सा व्हिएतनाममधून येतो. भारताच्या तांदूळ निर्यातीवरील निर्बंधामुळे फक्त आशियावरच परिणाम होणार नसून आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशही याच्या तडाख्यात सापडणार आहेत. फिंच सोल्यूशन्सचे संशोधन युनीट असलेल्या बीएमआयने म्हटले आहे की, भारताच्या निर्यात निर्बंधामुळे जिबूती, लायबेरिया, कतार, गाम्बिया आणि कुवेतला मोठा झटका बसू शकतो.

यापू्र्वी ऑक्टोबर २००७ मध्ये भारताने गैर बासमती तांदूळ निर्यातीवर निर्बंध लागू केले होते. ते केवळ तात्पुरते हटवले आणि एप्रिल २००८ मध्ये पुन्हा लागू केले. यादरम्यान किमती ३० टक्के वाढून २२.४३ डॉलर प्रती शंभर किलो (सीडब्ल्यूटी) या उच्चांकी स्तरावर पोहोचल्या होत्या. सीआयपीच्या आशिया विभागाचे संचालक समरेंदू मोहंती यांनी सांगितले की भारक तेव्हा जागतिक तांदूळ बाजारातील प्रमुख घटक नव्हता. आणि सध्याचे निर्बंध हे १६ वर्षापूर्वीच्या तुलनेत अधिक दूरगामी प्रभाव निर्माण करतील.

बाजारात संभाव्य भूकंप ?
मोहंती म्हणाले की, जर व्हीएतनाम, कंबोडियासारख्या प्रमुख तांदूळ निर्यातदारांनी स्वयं निर्यातीवर निर्बंध लागू केले, आणि इंडोनेशिया, मलेशियासारखे महत्त्वपूर्ण आयातदार साठवणुकीसाठी पुढे आले तर जागतिक तांदूळ बाजारपेठेत भूकंपच होऊ शकतो. २००७ मधील स्थितीपेक्षा ही स्थिती अतिशय भयंकर असेल. मोहंती म्हणाले की, भारताच्या तांदूळ निर्बंधामुळे प्रभावीत होणाऱ्या लोकांची संख्या लाखोंमध्ये असेल. ते म्हणाले की, भारतीय शेजारी देश, खास करुन बांगलादेश, नेपाळमधील गरीब ग्राहकांचे खूप नुकसान होईल. हे निर्बंध कमीत कमी एप्रिलपर्यंत भारतातील सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत असतील, अशी शक्यता व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here