जर इन्कमटॅक्स रिटर्नशी संबंधीत ई व्हेरिफिकेशन न केल्यास मिळणार नाही रिफंड

नवी दिल्ली : इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. या मुदतीपर्यंत ज्यांनी विवरणपत्र भरले नसेल ते विलंब आकार भरून आयटीआर दाखल करू शकतो. मात्र, जर तुम्ही आयकर रिटर्न भरला असेल आणि रिटर्नची वाट पाहत असाल तर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती माहित असणे आवश्यक आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही रिटर्न भरले असेल तरी ते तुम्हाला मिळू शकेल असे नाही.

एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आयकर रिटर्न रिफंड करण्यासाठी तुम्हीला आयटीआर व्हेरिफिकेशन महत्त्वाचे आहे. आयटीआर दाखल केल्यानंतर ३० दिवसांत त्याचे व्हेरिफिकेशन करणे महत्वाचे आहे. आधी ही मुदत १२० दिवस होती. ती आता ३० दिवसांवर आणण्यात आली आहे. एक ऑगस्टपासून ही मुदत लागू झाली आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमचे दाखल केलेले आयटी रिटर्न अवैध ठरू शकते.

मुदतीत पडताळणी न केल्यास तुम्हाला टॅक्स रिफंड मिळणेही शक्य नाही. नागरिकांना आयटी रिटर्नचे व्हेरिफिकेशन रजिस्टर्ड मोबाईल नंबरने करता येईल. त्याचा ओटीपी वापरून तुम्हाला ई व्हेरिफिकेशन करता येईल. यासाठी ईव्हीसी, डिमॅट, एटीएम, इव्हीसी नेटबँकिंग याचा वापर करता येईल. ई व्हेरिफिकेशननंतर याची माहिती तुम्हाला आयकर विभागाकडून दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here