बिजनौर : आगामी गळीत हंगामासाठी ऊस विभागाने साखर कारखान्यांकडे ऊस संरक्षणाचे प्रस्ताव मागितले आहेत. साखर कारखान्यांनी आपल्या गाळप क्षमतेनुसार आणि जुन्या ऊस लागवड क्षेत्र सुरक्षित ठेवण्याच्या आधारावर प्रस्ताव तयार करत ते पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यात जवळपास २,९४९ हेक्टरमधील ऊस पिकाचे पुर आणि अती पावसाने नुकसान झाले आहे. साखर कारखान्यांनी यंदा जादा उसाची मागणी केली आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखाने गीत हंगामात १८० दिवस अथवा आपल्या गाळप क्षमतेनुसार, अतिरिक्त उसाचीही मागणी करू शकतात. गेल्या अनेक वर्षांपासून साखर कारखाने अशा प्रकारे ऊस संरक्षणाच्या मागणीबाबत प्रस्ताव पाठविण्यात रुची दाखवत नव्हते. मात्र, यावेळी एक नवा साखर कारखाना सुरू झाल्याने आणि बिजनौर साखर कारखान्याने आपली गाळप क्षमता वाढवल्याने इतर कारखाने सजग झाले आहेत. ऊस संरक्षणाबाबत जिल्हास्तरीय प्रस्ताव तयार करून तो लखनौमध्ये पाठवला जाईल. तेथे ऊस संरक्षण समितीच्या बैठकीत याविषयी निर्णय घेतला जाणार आहे.
आगामी गळीत हंगामासाठी जिल्ह्यात २ लाख ५७ हजार हेक्टरमध्ये ऊस लागवड करण्यात आलेली आहे. यावेळी जिल्ह्यात १० कारखाने गाळप करतील. बिजनौर साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक राहुल चौधरी यांनी सांगितले की, ऊस संरक्षणासाठी प्रस्ताव मागविले आहेत. त्यानुसार आढावा घेतला असता असे दिसून आले की, कारखान्याला किमान ८१ लाख क्विंटल उसाची गरज भासेल. कारखान्याची क्षमता वाढल्याने दररोज ४५ हजार क्विंटल उसाचे गाळप केले जाईल. जुन्या ऊस खरेदी केंद्रांचीही मागणी आम्ही केली आहे. जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू असल्याचे सांगितले.