ऊस तोड कामगारांचे प्रश्न गंभीर : उगले

छत्रपती संभाजीनगर : ऊस तोडणी कामगार समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत. वर्षानुवर्षे त्यांच्या समस्या कायम आहेत. ऊस तोड कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणार तरी कधी ? असा सवाल अप्पासाहेब उगले यांनी केला. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे ऊस तोड कामगारांसाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. ऊस तोड कामगारांसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेत ऊसतोडणी कामगारांचीच नोंदणी न झाल्याचा आरोप ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने केला आहे. यावेळी मनसुख झांबड यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी निलेश गंडे, सुभाष राठोड, गोरख पाटील, ग्रामसेवक आदिती बुचके, सुप्रिया उगले, सतीश नागुर्डे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here