इथेनॉल उत्पादनासाठी धान्य टंचाईच्या समस्येवर सरकार शोधतेय उपाय

सरकारकडून इथेनॉल उत्पादकांना येत असलेल्या तुकडा तांदूळ (broken rice) आणि मक्का यांसारख्या फीडस्टॉकच्या तुटवड्याच्या समस्येच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

अन्न सचिव संजीव चोपडा यांनी शुक्रवारी सांगितले की, तांदळाच्या अनुपलब्धतेमुळे डिस्टिलरीजना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मक्का आणि तुकडा तांदळाच्या किमती जादा असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. हा मुद्दा सध्या आमच्या विचाराधीन आहे. या समस्येची आम्हाला माहिती आहे. लवकरच याबाबत आम्ही योग्य निर्णय घेऊ.

गेल्या महिन्यात भारतीय अन्न महामंडळाने आपल्या भांडारातून इथेनॉल उत्पादकांना तांदूळ पुरवठा रोखला आहे.

इथेनॉलच्या दरवाढीची ISMA ने मागणी केली आहे. याविषयी चोपडा म्हणाले की, एक समिती या मुद्यावर चर्चा करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here