श्रीलंकेतील साखर उत्पादनावर परिणाम शक्य

श्रीलंकेतील दुष्काळामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. आणि याचा थेट परिणाम उसासह इतर पिकांवर होईल अशी शक्यता आहे.

प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, पाण्याची कमतरता असल्याने ऊस शेतीला याचा मोठा फटका बसला आहे.

याबाबत सेवानागला शुगर इंडस्ट्रिजचे सीईओ गामिनी रसपुत्रा यांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून साखर कारखान्याचे कामकाज विस्कळीत झाले आहे. जर पुढील दोन आठवड्यात पुरेसा पाऊस झाला नाही तर कारखान्याचे व्यवस्थापन सुरू ठेवणे अशक्य होईल अशी स्थिती आहे.

दुष्काळामुळे देशातील साखर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींनी सध्याच्या कोरड्या हवामानामुळे पिकांच्या नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाईच्या तरतुदीस मंजुरी दिली आहे, अशी माहिती कृषी मंत्री महिंदा अमरवीरा यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here