उसाची पळवापळवी केल्यास कारखान्यांना बसतोय फटका : मुरकुटे

अहमदनगर : प्रवरा आणि संगमनेर सहकारी साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी करू नये, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे. संगमनेर साखर कारखाना गणेश कारखान्याचा ऊस नेणार नाही. तसेच गणेश कारखान्याची काळजी असेल तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही गणेश कारखान्याचा ऊस नेऊ नये, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी गणेशसह अशोक, अगस्ती व इतर कारखान्यातही गुस्खोरी न करण्याचा निर्णय थोरात यांनी घ्यावा, असे म्हटले आहे.

कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नसताना संगमनेर आणि प्रवरा साखर कारखान्याने आपली गाळप क्षमता वाढवली आहे. दोन्ही कारखान्यांनी उसाबाबत स्वावलंबी व्हावे, इतर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करू नये, असे आवाहनही मुरकुटे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here