मेरठ : सरुरपुर गावातील शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिलासाठी ऊस अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी किनौनी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची अडवणूक केल्याचा आरोप केला. लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सरुरपूरमधील शेतकऱ्यांनी विनय मल्लापूर यांच्या नेतृत्वाखाली मेरठ जिल्हा ऊस अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी किनौनी कारखान्याने ऊस बिले दिली नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांनी ऊस खरेदी केंद्र बदलून नगलामल, दौराला, खतौली कारखान्याकडे द्यावा अशी मागणी केली.यावेळी विनय मल्लापूर यांनी सांगितले की, किनौनी कारखाना आणि मोहद्दीपुर कारखान्याने एक आठवड्यात पैसे दिले नाहीत तर १७ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर आंदोलन केले जाईल. पिंटू, रवी, रवींद्र, राजपाल आदी उपस्थित होते.