स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील गटबाजीचे राजू शेट्टींकडून खंडन

कोल्हापूर / पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (एसएसएस) अध्यक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी संघटनेत फूट पडल्याच्या चर्चेचे खंडन केले आहे. शेट्टी यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे प्रमुख नेते रवीकांत तुपकर यांनी अलिकडेच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शेट्टी यांच्या कार्यशैलीवर त्यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेत दोन गट पडल्याची चर्चा आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातून दोनदा खासदारपद भूषविलेल्या शेट्टी यांनी तुपकर यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी पुण्यात ८ ऑगस्ट रोजी पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक बोलावली होती.मात्र, तुपकर बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. ते आपल्या बुलढाणा जिल्ह्यातच थांबले. बुलढाणा जिल्ह्यात तुपकर यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे.

तुपकर यांनी सत्तारुढ भाजपमध्ये इथवा इतर कोणत्याही पक्षात सहभागी होणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल तुपकर म्हणाले, मी वारंवार शेट्टी यांच्या समोरही त्यांच्या कार्यशैलीविषयी आपला असंतोष, व्यक्तिगत मते मांडली आहेत. हा कोणताही ताजा विषय नाही. गेल्या चार ते पाच वर्षांपासून यावर चर्चा सुरू आहे. जर शेट्टी यांना माझे प्रश्न माहिती आहेत, तर मग वारंवार बैठका आयोजित करण्याची काय गरज आहे? असा सवालही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here