उत्तर प्रदेश : ऊस क्लिनिकमुळे उत्पादन वाढण्यासाठी मिळणार मदत

सहारनपूर : गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशने ऊस आणि साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. उसाचे उत्पादन आणखी वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील ऊस पट्ट्यात ऊस क्लिनिक सुरु करण्यात आली आहेत. ऊस आयुक्त आणि सहकारी ऊस समितीच्या माध्यमातून ऊस खरेदी केंद्रांवर ऊस क्लिनिक सुरू केली जात आहेत. या क्लिनिकमध्ये शेतकरी पिकाबाबत योग्य माहिती मिळवू शकतील. या क्लिनिकमध्ये उसावरील किड, रोगांविषयी शेतकऱ्यांना   मार्गदर्शन केले जाईल.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ऊस आयुक्त ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये सर्व ऊस समित्या, साखर कारखान्यांमध्ये ही ऊस क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. ऊस क्लिनिकमध्ये शेतकऱ्यांच्या माहितीचे तपशील ठेवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना शेती तज्ञांकडून सल्ला दिला जाईल. उसाच्या नवनव्या प्रजातींबाबत, आंतरपिक, शास्त्रिय पद्धतीने ऊस बांधणी आदींची माहिती दिली जाईल. युरिया, डीएपी, नॅनो युरिया सोबत उसातील किटकनाशके, बियाण्यांवर उपचार आदींबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here