उत्तराखंड : साखर कारखाना समित्यांचे २८ कोटींचे अंशदान थकीत

रुडकी : साखर कारखान्यांकडे कोट्यवधी रुपयांचे अंशदान थकीत असल्याने इकबालपूर ऊस विकास समिती आणि त्याच्याशी संलग्न शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. समितीचे जवळपास २८ कोटी ४० लाख ५१ हजार साखर कारखान्याकडे थकीत आहेत. यापूर्वी ऊस समिती आपल्याकडील पैसे खर्चून खत खरदेची व्यवस्था करत होती. त्यामुळे ज्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक अडचण भेडसावत होती, अशा वेळी त्यांना खते उपलब्ध होत होती.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, समितीचे बजेट बिघडल्याने ही सुविधा बंद करण्यात आली आहे. समितीकडून दिल्या जाणाऱ्या कर्जांमध्येही घट झाली आहे. दरम्यान, इकबालपूर ऊस विकास समितीवर शेतकऱ्यांचे जुने कर्जही थकीत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास ३३ वर्षांचे कर्ज अद्याप भरलेले नाही. शेतकऱ्यांनी गळीत हंगाम १९८९-९० पासून आजपर्यंत जवळपास तीन कोटी रुपयांचे कर्ज भरलेले नाही. त्यामुळे समितीही आर्थिक अडचणीत आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here