कर्जदारांना नवा झटका नाही, RBIकडून रेपो रेट ६.५ टक्क्यांवर जैसे थे

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) बैठक संपन्न होवून नव्या निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ८ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या सहा सदस्यांच्या एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, या वेळीसुद्धा रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आला आहे. म्हणजेच आता रेपो रेट ६.५ टक्के राहिल आणि गृह कर्ज अथवा वाहन कर्ज घेणाऱ्यांवर ईएमआयचा बोजा वाढणार नाही.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात येत नसल्याची घोषणा करताना सांगितले की, भारत योग्य दिशेने मार्गक्रमण करीत आहे. आम्ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत आणि आमच्या अर्थव्यवस्थेत सातत्यपूर्ण वाढ आहे. भारत सद्यस्थितीत जागतिक अर्थव्यवस्थेत होणाऱ्या बदलांचा फायदा घेण्यासाठी चांगले प्रयत्न करीत आहे. जागतिक विकासात भारतीय अर्थव्यवस्थेचे १५ टक्के योगदान आहे.

देशात महागाई उच्च स्तरावर पोहोचल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून सलग नऊ वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. या कालावधीत हा दर २५० बेसिस पॉईंट्सने वाढविण्यात आला. नंतर महागाईवर आळा घालण्यात आल्याचे सांगून आरबीआयने दरवाढीला ब्रेक लावला आहे. फेब्रुवारी २०२३ नंतर यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुढील काळातही आरबीआय दर स्थित ठेवेल असे तज्ज्ञांचे अनुमान आहे. यापूर्वी एप्रिल, जून महिन्यात झालेल्या बैठकांमध्येही हा दर स्थिर ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here