लातूर : बेलकुंड येथे संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्यावर राज्याचे माजी मंत्री, सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे यांच्या हस्ते सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्यामुळे शेतकरी, सभासदांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण केल्याचे मत दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले.
या वेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. श्रीपतराव काकडे, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, मारूती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक साळुंके, पाटील, सचिन पाटील, मांजरा साखर कारखान्याचे संचालक कैलास पाटील, सचिन दाताळ, बालाजी साळुंके, सतीश पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, कारखान्याचे विविध खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.