भारतातील तांदूळ निर्यात बंदी आणि प्रतिकूल हवामानामुळे तांदळाच्या किमती गेल्या 12 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत, असे यूएन फूड एजन्सीने म्हटले आहे. यातून उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जुलैसाठी अन्न आणि कृषी संघटनेचा सर्व तांदळाचा मूल्य निर्देशांक २.८ टक्क्यांनी वाढून १२९.७ अंकावर पोहोचला.
एफएओकडील आडेवारीनुसार असे दिसून येते की, ही आकडेवारी एक वर्षापूर्वीच्या तुलनेत १९.७ टक्के अधिक आहे. आणि सप्टेंबर २०११ नंतर नाममात्र उच्च स्तरावर आहे. थायलंडमध्ये किमतीत गतीने वाढ झाली आहे.
अहवालात म्हटले आहे की, काही पुरवठादारांमधील उत्पादनावर अल नीनोच्या संभाव्य प्रभावावरील चिंतेने किमती आणखी मजबूत बनवण्यास मदत झाली आहे. सध्या असलेला उकाडा, शरद-ऋतुतील पिकामध्ये पावसामुळे निर्माण झालेला अडथळा, गुणवत्ता परिवर्तनामुळे व्हिएतनाममध्ये दर आणखी वाढले आहेत.