प्रत्यक्ष कर संकलनाच्या 10 ऑगस्ट 2023 पर्यंत हाती आलेल्या तात्पुरत्या आकडेवारीत सातत्यपूर्ण वाढ नोंदवण्यात आली आहे. 10 ऑगस्ट 2023 पर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन लक्षात घेता एकूण 6.53 लाख कोटी रुपये इतके सकल कर संकलन झाले असून ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील सकल कर संकलनापेक्षा 15.73% अधिक आहे. परतावा लक्षात घेतल्यानंतरचे प्रत्यक्ष कर संकलन, 5.84 लाख कोटी रुपये आहे जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ कर संकलनापेक्षा 17.33% अधिक आहे. हे संकलन आर्थिक वर्ष 2023-24 मधील प्रत्यक्ष करांच्या एकूण अर्थसंकल्पीय अंदाजांच्या 32.03%आहे.
दिनांक 1 एप्रिल 2023 ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत परताव्यापोटी 0.69 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत आणि हा परतावा गेल्या वर्षात याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यांच्या तुलनेत 3.73% जास्त आहे.
(Source: PIB)