पीएम किसान योजनेमध्ये नोंदणीसाठी करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे. गेल्या महिन्यात या योजनेचा १४ वा हप्ता जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपयांचा लाभ मिळतो. शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात २००० रुपये दिले जातात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाते.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आता सरकारने पीएम किसान योजनेच्या १५व्या हप्त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर पीएम किसानच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. येथे तुम्हाला फार्मर्स कॉर्नर हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला न्यू फार्मरच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ग्रामीण अथवा शहरी या दोन्हीपैकी एकाची निवड करावी. त्यानंतर आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि राज्य निवडावे. त्यानंतर ओटीपीचा पर्याय स्वीकारावा.

मोबाईलवर आलेल्या ओटीपीमधील क्रमांक भरल्यानंतर प्रोसेस फॉर रजिस्ट्रेशनवर क्लिक करावे. तेथे गरजेनुसार आपली माहिती देवून आधार प्रमाणिकरण करावे. आपली कागदपत्रे अपलोड करून ही माहिती सेव्ह करावी. जेव्हा प्रक्रिया पूर्ण होईल, तेव्हा याची माहिती मोबईलवर कळेल. पीएम किसान योजनेशी संबंधित माहितीसाठी किंवा तक्रारीसाठी तुम्ही ई-मेल किंवा आयडीवर संपर्क साधू शकता. pmkisan-ict@gov.in हा ई मेल आयडी आहे. यासोबतच हेल्पलाईन क्रमांकावर संपर्काची सोय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here