मुंबई : उशीरा आलेला मान्सून आणि धरणांतील कमी पाणीसाठा यामुळे आगामी साखर हंगामात स्थिती गंभीर होईल अशी शक्यता महाराष्ट्राचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली.
याबाबत द हिंदू बिझनेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) बोलताना मंत्री वळसे-पाटील म्हणाले की, गेल्या हंगामात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी आधीच्या हंतामाच्या तुलनेत कमी गाळप केले होते. आणि साखर उत्पादन कमी झाले होते. आगामी हंगामातही तसेच होईल अशी शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये खूप कमी पाऊस झाला आहे. आणि धरणात पाणीसाठा कमी आहे. सरकार पाण्याच्या उपलब्धतेच्या आधारावर पाणी व्यवस्थानाचे प्रयत्न करीत आहे.
ते म्हणाले की, २०२२-२३ मध्ये कमीत कमी २१० साखर कारखान्यांनी १,०५३.१७ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. तर २०२१-२२ मध्ये साखर उत्पादन १,३७३ लाख क्विंटल झाले आहे. ते म्हणाले की, राज्य सरकार या परिस्थितीवर नजर ठेवून आहे. आणि साखर कारखान्यांसमवेत व्यवस्थापन करीत आहे. मंत्री म्हणाले की, राज्य सरकारने सर्व साखर कारखान्यांच्या प्रमुखांसोबतच विचार करीत आहे. आणि साखरेची एमएसपी वाढविण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव देण्याची योजना तयार करीत आहे.