ब्राझीलियन कंपनी Caramuru कडून सोयाबीनपासून उत्पादित इथेनॉल विक्री सुरू

साओ पाउलो : ब्राझीलियन अन्न आणि इंधन प्रोसेसर Caramuru Alimentos ने मध्य-पश्चिमी ब्राझीलमध्ये आपल्या प्लांटमध्ये सोयाबीनपासून उत्पादित इथेनॉलची विक्री सुरू केली आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सोयाबीनचे सह उत्पादन असलेल्या soy molasses पासून मोठ्या प्रमाणावर उत्पादित हायड्रोस इथेनॉल विक्री करणारी Caramuru जगातील पहिल्या कंपन्यांपैकी एक बनली आहे. Caramuru ब्राझील सहावे सर्वात मोठे सोयाबीन क्रशर आणि दुसरा सर्वात मोठा मक्का प्रोसेसर आहे. यासोबतच बायोडिझेल उत्पादनातील प्रमुख घटक आहे.

ब्राझीलमध्ये हायड्रोस इथेनॉलचा वापर ऑटोमोटिव्ह इंधन म्हणून केला जाऊ शकतो. तेथे बहुतेक कार १०० % इथेनॉलवर चालू शकतात आणि ते मोठ्या प्रमाणावर परफ्यूम, हार्ड-सर्फेस क्लीनर, सॉल्व्हेंट्स आणि पेंट्सच्या उत्पादनातदेखील वापरले जाते. ब्राझील, जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक आणि निर्यातदार देश असून इथेनॉल आणि सोया-आधारित बायोडिझेलसारख्या जैवइंधनांमध्ये देखील जागतिक स्तरावर आघाडीवर आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीनवर आधारित इथेनॉल आता मध्य -पश्चिमी शहर सोरिसोमध्ये Caramuru च्या प्लांटमधून विक्री केली जाते. येथे प्रती वर्ष ९.५ मिलियन लिटर हायड्रोस इथेनॉल केले जाऊ शकते. ब्राझीलच्या आघाडीच्या धान्य उत्पादक माटो ग्रोसोमध्ये सोरिसो प्लांटमध्ये सोया तेल आणि लेसिथिनचेही उत्पादन केले जाते. Caramuru ने म्हटले आहे की, सोयाबीन आधारित इथेनॉल योजनेला सरकारशी संलग्न एका एजन्सीद्वारे आर्थिक मदत केली गेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here