भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेचा सरकारसोबत सामंजस्य करार, 2023-24 साठी 4350 कोटी महसुलाचे लक्ष्य

नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (आयआरईडीए) या मिनी रत्न श्रेणीतील उपक्रमाने केंद्रीय नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयासोबत कामगिरी आधारित सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सार्वजनिक आस्थापना विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून हा सामंजस्य करार असून 2023-24 आणि 2024-25 या आर्थिक वर्षातील आयआरईडीएच्या धोरणात्मक लक्ष्यांना तो निर्धारित करत आहे.

सामंजस्य करारानुसार भारत सरकारने आयआरईडीएसाठी 2023-24 साठी त्यांच्या परिचालन कार्याद्वारे 4350 कोटी रुपये महसुलाचे आणि 2024-25 साठी 5220 कोटी रुपये महसुलाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात 3361 कोटी रुपये लक्ष्याच्या तुलनेत 3482 कोटी रुपयांचे लक्ष्य साध्य केले होते.

निव्वळ मालमत्तेवर परतावा, भांडवलावर परतावा, एकूण कर्ज आणि थकित कर्जाचे गुणोत्तर, मालमत्ता उलाढाल गुणोत्तर आणि प्रति समभाग उत्पन्न यांच्यासह कामगिरीचे प्रमुख मानक स्पष्ट केले आहेत.

एमएऩआरईचे सचिव भूपेंद्र सिंग भल्ला आणि आयआरईडीएचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी 21 ऑगस्ट 2023 रोजी नवी दिल्ली येथे अटल अक्षय ऊर्जा भवनात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. गेल्या तीन आर्थिक वर्षात कंपनीच्या कामगिरीचा असामान्य लौकिक कायम राहिल्यामुळे यापुढील काळातील महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता कंपनीमध्ये निर्माण झाली असल्यावर  मुख्य व्यवस्थापकीय संचालकानी भर दिला.

सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरीचा आयआरईडीएचा लौकिक तिच्या उत्कृष्ट मानांकनातून आणि गेल्या तीन आर्थिक वर्षात या सामंजस्य करारासाठी 96 पेक्षा जास्त गुण प्राप्त करण्यामधून सिद्ध होत आहे, अशी माहिती मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी दिली. 21 ऑगस्ट 2023 पर्यंत कंपनीने 3137 अक्षय ऊर्जा प्रकल्पांना 1,55,694 कोटी रुपयांच्या संचित कर्जाच्या मंजुरीसह अर्थसहाय्य केले आहे आणि 1,05,245 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण केले आहे आणि देशात 22,061 मेगावॉट अक्षय ऊर्जा क्षमतेची भर घालण्यासाठी पाठबळ दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here