हरियाणा : शेतकऱ्यांची सहकारमंत्र्यांकडे ऊस दर प्रती क्विंटल ५०० रुपये करण्याची मागणी

रोहटक : भाली-आनंदपूर येथे साखर कारखान्यावर पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी आलेल्या सहकार मंत्री डॉ. बनवारीलाल यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. भाली ऊस उत्पादक शेतकरी समितीने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. उपस्थित शेतकऱ्यांनी समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. ऊस दर प्रती क्विंटल ५०० रुपये करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

शेतकरी समितीचे सुमित दलाल म्हणाले की, ‘माझे पीक-माझा तपशील’ या उपक्रमाच्या नोंदणीची तारीख वाढवावी अशी मागणी आम्ही सहकार मंत्र्यांकडे केली आहे. साखर कारखान्याच्या नवीन पेट्रोल पंपावरून बॉण्डवर असलेल्या शेतकऱ्यांना डिझेल द्यावे, शेतकऱ्यांना कमी दराने साखर उपलब्ध करून देण्यात यावी, कारखान्यातून निघणाऱ्या राखेचे योग्य व्यवस्थापन करावे, शेतकऱ्यांचे करार वाढवून द्यावेत अशी मागणी केली आहे. येथून पानिपत साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना भाडे देण्यात यावे, कारखान्याची देखभाल, दुरुस्ती पूर्ण करून एक नोव्हेंबरपासून गाळप सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. झज्जर जिल्ह्यात नवीन साखर कारखाना सुरू करण्याविषयीही शेतकऱ्यांनी निवेदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here