सांगली जिल्ह्यात उसावर किडीचा प्रादुर्भाव

सांगली : अगोदरच पावसाने ओढ दिल्याने चिंताग्रस्त बनलेला बळीराजा आता उसावर किडीचा प्रादुर्भाव पडल्याने धास्तावला आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, शिराळा, मिरज तालुक्यात उसावर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. कडेगाव तालुक्याचा विचार करता यंदा उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पावसाची कमतरता आणि किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी तालुक्यात १८ हजार ५९२ हेक्टर क्षेत्र ऊस लागवड झाली आली आहे. आडसाली क्षेत्रात ४३४ हेक्टरने वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून उसावर आलेल्या हुमणी, लोकरी मावा यांनी शेतकरी वैतागून गेला आहे. शेकडो एकरावरील ऊस हुमणी किडीने बाधित झाला आहे. कीड रोखण्यासाठी विविध उपाययोजना करूनही ही हुमणी कीड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here