नगर : मुळा सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीने श्रावण मास निमित्ताने श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे अन्नदान करण्यात आले. यावेळी मुळा कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांच्या हस्ते शनिदेवाला अभिषेक करण्यात आला. यावेळी कारखान्याचे सेक्रेटरी रितेश टेमक, सरव्यवस्थापक शंकरराव दरंदले, चीफ इंजिनियर मुकुंद ठोंबरे, चिफ केमिस्ट हेमंत पांढरपट्टे, डिस्टिलरी मॅनेजर बाळासाहेब दरंदले, जनसंपर्क अधिकारी बद्रीनाथ काळे, हेमंत दरंदले, योगेश गावटे, भाऊसाहेब बानकर, देशमुख, लक्ष्मण बारगळ, दसपुते, दीपक राजेंद्र दरंदले, कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक पवार, चिटणीस डी.एम. निमसे, खजिनदार सुभाष सोनवणे, विश्वस्त छबुराव भुतकर, प्रकाश जठार, राजेंद्र घावटे, पांडुरंग दरंदले, शनि शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त छबुराव भुतकर, माजी विश्वस्त आदिनाथ शेटे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक अशोक मिसाळ उपस्थित होते.
या उपक्रमासाठी संभाजी माळवदे, बाळासाहेब डोहाळे, आप्पासाहेब शिंदे, संजय राऊत, अशोक आरगडे, वृद्धेश्वर कारखाना कामगार संघटनेचे नेते रामनाथ गरड, शेषनारायण म्हस्के, एकनाथ जगताप, हारिभाऊ कोलते, प्रल्हाद पालवे, अशोक कारखाना कामगार संघटनेचे नेते रविंद्र तांबे, राहुरी कारखाना कामगार संघटनेचे नेते अर्जुन दुशिंग आदींनी परिश्रम घेतले.