कोल्हापूर : साखर उद्योगामुले शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थीक स्थैर्य आले आहे. शेतकऱ्यांनी शेती आणखी फायदेशीर होण्यासाठी उस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. ऊस उत्पादन वाढले तरच साखर कारखानदारी टिकेल आणि यशस्वी होईल, असे मत वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
उत्तर (ता. आजरा) येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्यावतीने आयोजित ऊस शेतकरी मेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती वसंतराव धुरे होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, साखर कारखान्यांचा हंगाम तीन-साडेतीन महिन्यांवर आल आहे. अनेक कारखाने उसाअभ्वी पूर्ण क्षमतेने चालविणे जिकीरीचे बनले आहे. त्यामुळे ऊस उत्पादन वाढविणे हाच साखर कारखानदारी सक्षम करण्याचा प्रमुख उपाय असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
यावेळी वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ अरुण देशमुख यांनी शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना एकरी १०० टन ऊस उत्पादन वाढीची पंचसूत्र सांगितली. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, काशीनाथ तेली, मारुतीराव घोरपडे, दीपक देसाई, शिरोप देसाई, महादेव पाटील, राजकुमार माळी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. ऊस विकास अधिकारी उत्तम परीट यांनी स्वागत केले. प्रास्ताविक शेती अधिकारी प्रतापराव मोरवाळे यांनी केले. प्रमोद तारेकर यांनी आभार मानले.