साखर उद्योग इथेनॉल मिश्रण वाढविण्यासाठी सकारात्मक आहे. आणि याबाबत सरकारसमोर अलिकडेच एका सादरीकरणात २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये ५० टक्के इथेनॉल मिश्रणाचा उद्दिष्ट ठेवण्यात आले. यासाठी एक महत्वाकांक्षी रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
या योजनेमध्ये डिस्टिलरी क्षमता वाढविण्यााठी ५०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची संकल्पना मांडली आहे. २०२५ पर्यंत २० टक्के मिश्रण मिळविण्याच्या आधीच्या निर्धारित १५,००० कोटी रुपयांपेक्षा ही वेगळी रक्कम असेल.
या प्लॅननुसार, २०३० पर्यंत ५० टक्के वार्षिक सरासरी राष्ट्रीय मिश्रण गाठण्यासाठी एकूण आवश्यक इथेनॉल पुरवठा जवळपास ३० बिलियन लिटर असेल. यामध्ये जवळपास १५-१६ बिलियन लिटर इथेनॉल ऊसावर आधारित मोलॅसिसपासून येईल. योजनेमध्ये सांगण्यात आले आहे की, इतर उत्पादन धान्य, मक्का आणि इतर स्रोतांपासून होईल.
द बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) द्वारे २०३० पर्यंत ५० टक्के सरासरी इथेनॉल मिश्रणाचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. अलिकडेच एका बैठकीत सरकार आणि नीती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर याचे सादरीकरण करण्यात आले होते.
यामध्ये ई १०० फ्लेक्स फ्युएल व्हेईकल (FFVs) चे व्यापक लाँचचे आवाहन करण्यात आले आहे. जे १०-१०० टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोलवर चालू शकेल.
योजनेनुसार, देशातील ३० बिलियन लिटर इथेनॉल उत्पादन झाल्यास आयात कमी होईल. यामध्ये २०३० पर्यंत जवळपास १५ बिलियन डॉलर परकीय चलनाची बचत होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जवळपास १.८० लाख कोटी रुपयांचा नफा होईल.