विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड साखर कारखान्यात ४२ पदांची भरती

सोलापूर : माढा तालुक्यातील विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड (म्हैसगाव) साखर कारखान्यात विविध पदांच्या ४२ जागांची भरती करण्यात येणार आहे. साखर कारखान्याची दैनदिन गाळप क्षमता ४९५० मेट्रिक टन असून १२ मेगावॅट क्षमतेचा सह- वीज निर्मिती प्रकल्प, ३० केएलपीडी डिस्टिलरी व ७० केएलपीडी क्षमतेचा एथेनॉल प्रकल्प आहे. तरी अनुभवी उमेदवारांनी त्यांचे अर्ज शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, संपर्क इत्यादी सर्टिफिकेटसह कारखान्याचे पत्यावर अथवा ई-मेलद्वारे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कारखान्यात पुढील जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. (पदाचे नाव आणि कंसात जागांची संख्या), शेती ऑफिस हेड क्लर्क – ०१, बॉयलर अटेंडंट– ०३, बॉयलर अटेंडंट (फायरमन) – ०५, बॉयलर D.C.S. ऑपरेटर- ०३, बॉयलर वॉटरमन (हंगामी) -०४, टर्बाईन अटेंडंट- ०२, खलाशी – ०२, इलेक्ट्रीशियन- ०१, वायरमन बी ग्रेड- ०४, स्वीच बोर्ड ऑपरेटर 3MW – ०४, मॅन्यु. केमिस्ट- ०२, पर्यावरण अधिकारी -०१ , क़्वाड्रीपल मेट -०४, लॅब केमिस्ट -०३. कारखान्याने दिलेल्या जाहिरातीत म्हटले आहे कि, अर्जदाराला वरील पदाचा किमान ५ ते ७ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here