यशवंत शुगरला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली भेट

सांगली : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे फिल्ड ऑफिसर डॉ. गजानन खडकीकर यांनी यशवंत शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (नागेवाडी) कारखाना साइटला भेट दिली. कारखान्याचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (इ. टी. पी.), कारखान्याच्या बॉयलरची राख चिमणीतून बाहेर पडू नये यासाठी त्यावर प्रक्रिया करणारा वेट स्क्रबर, स्टोरेज टँक, कामगार कर्मचारी निवास्थानाजवळील सांडपाणी साठवणूक व्यवस्था आदीची डॉ. खडकीकर यांनी पाहणी केली.

यावेळी भारती शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वर्क्स मॅनेजर प्रकाश तुपे, चिफ केमिस्ट विकास सूर्यवंशी, पर्यावरण व्यवस्थापक अशोक सूर्यवंशी, सुरक्षा अधिकारी जी. डी. निकम, सिव्हिल सुपरवायझर रामचंद्र करे, सूर्यकांत पाटील, अर्जुन मोकाशी, रणजित काळे, रणजित शेडगे, सारिका माने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here