बांगलादेशने भारताकडे साखरेसह इतर जीवावश्यक वस्तूंच्या सुरक्षित पुरवठ्याची मागणी केली आहे.
बांगलादेशचे वाणिज्य मंत्री टीपू मुन्शी यांनी भारत सरकारकडे भारत ते बांगलादेशसाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठ्यासाठी प्रस्तावित प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी भारतातील जयपूरमध्ये G२० व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांच्या बैठकीआधी भारतीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत हे आवाहन केले. G२० व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांची शुक्रवारी जयपूरमध्ये बैठक झाली.
टीपू मुन्शी यांनी भारताकडून बांगलादेशला जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी एक प्रक्रिया तयार करण्यात प्रगती झाल्याने भारतीय वाणिज्य मंत्र्यांना धन्यवाद दिले. ही प्रस्तावित प्रक्रिया लवकर कार्यान्वित करण्यासाठी कायमस्वरुपी पाठबळाची मागणी केली. बांगलादेशमध्ये साखरेच्या दरात अलिकडेच वाढ दिसून आली आहे. सद्यस्थितीत भारताने साखर निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत.