सहारनपूर : भाकियू (तोमर) गटाशी संलग्न शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिलांची मागणी करत ३१ ऑगस्टपासून बजाज साखर कारखाना गांगनौलीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रेल्वे रोडवरील कार्यालयावर आयोजित बैठकीत बजाज साखर कारखान्याने ऊस बिले न दिल्याने रोष व्यक्त करत संघटनेचे पश्चिम विभाग अध्यक्ष जितेंद्र चौधरी यांनी सांगितले की, साखर कारखान्याद्वारे गेल्या गळीत हंगामात ऊस बिले न मिळाल्याने शेतकरी आर्थिक समस्यांशी झुंज देत आहेत. शेतकऱ्यांना बँकांबाबत तसेच ऊस समितीद्वारे वसुलीसाठी नोटिसा पाठवल्या जात आहेत.
युवार जिल्हाध्यक्ष सौरभ त्यागी, शेतकरी नेते पप्पल चौधरी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आपल्याच पिकाचे पैसे मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागणे दुर्दैवी आहे. यावेळी यश त्यागी, विजय त्यागी, प्रदीप त्यागी, संजय चौधरी, हसीब रजा, आशू चौधरी, कमल सिंह, पप्पू, चंद्रपाल, गोपाल सैनी, लहरी सिंह, रणधीर सिंह आदी उपस्थित होते.