ऑगस्ट महिना संपत आला आहे. सप्टेंबर २०२३ची सुरुवात होणार आहे. अशा स्थितीत जर तुमचे काही बँकेशी संबंधीत काम असेल तर पुढील महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासून पाहावी. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार या महिन्यात १६ दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्रीय बँकेकड़ून दर महिन्याला बँक हॉलिडेची यादी आपल्या वेबसाईटवर अपलोड केली जाते. सप्टेंबर २०२३ मध्ये बँकांना सोळा दिवस सुट्टी राहिल. यामध्ये विविध राज्ये, शहरांमध्ये होणारे सण, चार रविवार आणि दुसऱ्या तसेच चौथ्या शनिवारचा समावेश आहे.
बँकांना असणाऱ्या सुट्ट्या राज्य आणि शहरांमध्ये भिन्न असू शकतात. सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी सारखे सण आहेत, त्या दिवशी आरबीआयने बँकांना सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय ३, ९, १०, १७, २३ आणि २४ सप्टेंबर या दिवशी रविवार आणि दुसरा चौथा शनिवार असल्याने बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही.