लातूर : येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यास ऊस तोडणी वाहतुक करतो म्हणून तब्बल ५९ लाख ८० हजार ४७० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लातूरसह पुणे, उस्मानाबाद, नदिड, सोलापूर जिल्ह्यातील २४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०१८-१९ व २०२०-२१ साठी ऊस तोडणी वाहतुक करतो म्हणून कारखान्यासोबत करार करुन ५९ लाख ८० हजार ४७० रुपये धनादेशाद्वारे उचलले. परंतू, कारखान्याला ऊस तोडणी वाहतुक न करता २४ जणांनी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत संगनमत करून, कारखान्याने दिलेल्या पैशाचा स्वतः च्या फायद्यासाठी वापर करून कारखान्याची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या संदर्भात कारखान्याचे कर्मचारी विनयकुमार वामनराव टमके यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत २४ जणांविरोधात गुरनं ६४५/२३ कलम ४२०, ४०८, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.