अगवानपूर : अगवानपूर परिसरात ऊस पिकावरील लाल सड रोगाचा फैलाव झाला आहे. जवळपास १६ लाख क्विंटल ऊस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कृषी संशोधक आणि साखर कारखान्याचे अधिकारी ०२३८ या प्रजातीच्या उसाऐवजी दुसऱ्या उसाची लागवड करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना करीत आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुरादाबाद विभागाला राज्यात उसाचा पट्टा मानला जातो. या वेळी ऊस पिकावर लाल सड रोगाचा फैलाव झाला आहे. दिवाण साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा ऊस अधिकारी आणि शाहजहांपूरच्या ऊस संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजीव यांच्यासोबत ऊस क्षेत्राचा सर्व्हे केला. परिसरातील डझनभर गावातील ऊस पिकाची पाहणी करून त्यांनी स्थितीचा आढावा घेतला. लाल सड रोगामुळे जवळपास १६ लाख क्विंटल ऊस क्षेत्राला फटका बसल्याचे स्पष्ट झाले.
साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यंदा जवळपास २५ टक्के कमी ऊस मिळेल. साखर कारखान्याचे ऊस अधिकारी रामेंद्र त्यागी यांनी सांगितले की, ०२३८ प्रजातीच्या ऊसाचा लाल सड रोगाचा फैलाव झाला आहे. शेतकऱ्यांना इतर प्रजातीचा ऊस लागवड करावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकाचे चक्र बदलण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा ऊस अधिकारी राम किसान, ऊस विकास निरीक्षक शिराज मलिक, उप महाव्यवस्थापक गंभीर सिंह, सुरेंद्र सिंह आदी उपस्थित होते.