जाणून घ्या, २७ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशात किती ऊस बिले मिळाली ?

भारत सरकार ऊस बिले वेळेवर मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आणि या प्रयत्नांतर्गत देशातील साखर कारखान्यांकडून वेळेवर बिले मिळत आहेत.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाद्वारे (DFPD) ट्विटरवर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात सद्यस्थितीत २०२२-२३ या हंगामात २७ ऑगस्ट २०२३ पर्यंत ११३.४८ कोटी (११३.४८K crore) पैकी १०५.६५ हजार कोटी (१०५.६५K crore) रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत.

DFPD ने ट्विटरवर म्हटले आहे की, चालू गळीत हंगामातील सर्व ऊस बिले त्वरीत दिली जावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातून आपल्या शेतकऱ्यांना वेळेवर बिले देण्यासाठीची आमची वनचबद्धता दिसून येईल.

देशात इथेनॉल उत्पादनाला चालना दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर बिले मिळत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलिकडेच म्हटले होते की, पूर्वीच्या साखर कारखानदार शेतकऱ्यांची उसाची बिले देऊ शकत नव्हते. इथेनॉल उत्पादनासाठी सरकारी प्रोत्साहनामुळे आम्ही आरामदायी स्थितीत आहोत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर बिले मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here