श्री विघ्नहर कारखान्याची ‘स्मार्ट कार्ड’ योजना साखर उद्योगासाठी दिशादर्शक : सत्यशील शेरकर

पुणे  :  श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने नेहमीच काळाची पावले ओळखून मार्गक्रमण केले आहे. आता कारखान्याने लागू केलेली स्मार्ट शेतकरी कार्ड, स्मार्ट एम्प्लॉयी कार्ड, स्मार्ट ट्रान्सपोर्टर कार्ड ही योजना महाराष्ट्रातील पहिली संगणकीकृत योजना आहे. ही योजना साखर उद्योगासाठी दिशादर्शक ठरेल,  असे मत कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी व्यक्त केले.

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ४१ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषय उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूर केले.  यावेळी गळीत हंगाम २०२२- २३ मध्ये उल्लेखनिय कामगिरी करणारे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कॉन्ट्रक्टर यांचा तसेच स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वत्कृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्ति पत्र देवून सत्कार करण्यात आला.

शेरकर म्हणाले, विस्तारीत  इथेनॉल प्रकल्पाचे काम मागील हंगामामध्ये पूर्ण झाले आहे. येत्या २०२३-२४ ऊस गाळप हंगामापासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यात येणार आहे.  मयत सभासदांचे शेअर्स लवकरात लवकर वर्ग करुन घ्यावेत, असे आवाहन शेरकर यांनी केले. विषयपत्रिकेचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी केले. आभार व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here